🔥 ट्रेंडिंग रवि जाधव की नई फ़िल्म 'फूलवारा' का टीज... ‘Avengers: Doomsday’ ट्रेलर ने 560 मिल... हजारीबाग होटल में शादी के दौरान गोलीबा... झारखंड विधानसभा ने दो‑दिन की विशेष सत्... पलामू में घर में मिली महिला की मौत, पर... पावर मंत्रालय का निर्णय: टाटा पावर, अड...
25 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजनीति

इंदापूरमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्याला सर्वपक्षीय समर्थन, खोटे अर्ज करनारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

✍️ रिपोर्टर: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 25 नव. 2026, 01:31 PM 👁 25
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

इंदापूरच्या प्रामाणिक अधिकाऱ्याला विविध राजकीय पक्षांचे समर्थन मिळाले असून, खोटे अर्ज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.

इंदापूर : निःपक्षपाती आणि प्रामाणिकपणे काम करणारे इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना पाठिंबा देण्यासाठी आज इंदापूरमध्ये सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, शेतकरी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात बॅनर, फलक घेऊन नागरिकांनी "प्रामाणिक अधिकाऱ्याला पाठिंबा", "निःपक्ष कारभाराला पाठिंबा" अशा घोषणा दिल्या.

तहसीलदार बनसोडे हे कोणताही भेदभाव न करता, कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्य नागरिकांची कामे करतात. त्यांच्या या निःपक्षपाती कारभारामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनावर कोणताही दबाव न आणता प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करू द्यावे, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.

एस.आय.आर. मध्ये खोटे अर्ज व मूळ रहिवासी असणाऱ्या मतदारांची नावे वगळण्यासाठी खोटे अर्ज दाखल करणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे.

एस.आय.आर. च्या प्रक्रियेत खोटे अर्ज करून मूळ रहिवासी मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. असे प्रकार लोकशाहीला घातक असून याप्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मोर्चात मांडण्यात आली.

मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, पक्ष, जात, धर्म यापलीकडे जाऊन चांगल्या कामाला पाठिंबा देणे हीच खरी लोकशाही आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे.
📲Get App