🔥 ट्रेंडिंग ओडिशा ने 40,000 करोड़ रुपये के औद्योगि... आंध्र प्रदेश ने स्थानीय निकाय चुनावों... आंध्र प्रदेश में 28 अक्टूबर को नगरपालि... ईसीआई ने आंध्र प्रदेश में सारांश संशोध... जोधपुर पंचायत चुनाव: 208 में से 148 ना... दुर्गापूजा पर्व के मद्देनजर हजारीबाग प...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; १५ हजार कोटींची गुंतवणूक, विरोधकांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर

ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; १५ हजार कोटींची गुंतवणूक, विरोधकांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 14 अक्टू. 2026, 10:52 PM 👁 12
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप मिळाली असून, विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला चोख प्रत्युत्तर मिळाल्याचे उद्योग मंत्र्यांनी म्हटले आहे.

पुणे, दि. १४ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणाऱ्या ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक सामर्थ्यात भर घालणारा आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रात उद्योग येत नसल्याचा आणि राज्यातील गुंतवणुकीबाबत नकारात्मक चित्र निर्माण करण्याचा विरोधकांचा अपप्रचार उघड झाला आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

२०२४ मध्ये दावोस येथे ह्युंदाई मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारातून पुढे आलेल्या प्रकल्पाचे प्रत्यक्षात रूपांतर होणे, ही राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाची आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महायुती सरकार करत असलेल्या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण साक्ष आहे. केवळ सामंजस्य करार करून थांबण्याऐवजी गुंतवणूक प्रत्यक्षात आणण्यावर सरकारचा भर असल्याचे या प्रकल्पातून अधोरेखित होते.

महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत, राज्याची औद्योगिक आघाडी कमकुवत होत आहे आणि महायुती सरकारच्या काळात गुंतवणुकीला खीळ बसली आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प आणि त्याचे उद्घाटन या आरोपांना विकासाच्या माध्यमातून उत्तर देणारे ठरले आहे. विरोधकांनी आरोपांच्या राजकारणापेक्षा राज्यात प्रत्यक्षात येणाऱ्या गुंतवणुकीकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधींकडे पाहावे, असा संदेशही या प्रकल्पातून मिळत आहे.

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, आधुनिक उत्पादन क्षेत्राचा विस्तार आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी गुंतवणूक यांना महायुती सरकारने प्राधान्य दिले आहे. देशातील आघाडीचे औद्योगिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांचे महत्त्व मोठे आहे. दावोस येथे झालेला करार प्रत्यक्षात उतरवून महायुती सरकारने विकासाची बांधिलकी अधोरेखित केली आहे. आरोपांना उत्तर कामातून आणि आश्वासनांना कृतीतून देणे, हीच सरकारची कार्यपद्धती आहे. ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे उद्घाटन हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून, राज्याच्या प्रगतीची ही वाटचाल अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
📲Get App