🔥 TRENDING नीम करौरी धाम पहुंचीं बाबा नीम करौली क... ઉગલવાણથી નાના આસણારા તરફ જતા રોડની સ્થ... मोहम्मदी मंडी में अव्यवस्था का बोलबाला... ଭୁବନେଶ୍ୱରରେ ଘରେ ପଶି ଯୁବତୀଙ୍କୁ ଦୁଷ୍କର୍ମ... ‘ସୁଜଳ’ ଅଭିଯାନର ଶୁଭାରମ୍ଭ କଲେ ନଗର ଉନ୍ନୟନ... ଓଡ଼ିଶା ଖଣି ଯାନ୍ତ୍ରିକ ବିଦ୍ୟାଳୟ ହଷ୍ଟ୍ରେଲର...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

हर्दखळे ग्रामपंचायतीतील गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांनी CEO कडे केला जाब

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 03 Oct 2026, 11:54 AM 👁 28
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. १० महिने मिनिट्स बुक कोरे ठेवणाऱ्यांवर कारवाई कधी? असा सवाल किरण चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे.

लांजा: तालुक्यातील हर्दखळे ग्रामपंचायतीच्या संशयास्पद कारभारावरून निर्माण झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. या संपूर्ण प्रकरणात लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का, असा थेट आणि खळबळजनक सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील विविध गैरप्रकारांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली असली, तरी समिती गठीत होण्यापूर्वी घडलेल्या गंभीर अनियमिततांवर प्रशासन काय पाऊल उचलणार, अशी विचारणा करत किरण दत्ताराम चव्हाण यांनी थेट जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे धाव घेतली आहे.

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा आणि मासिक बैठकींच्या इतिवृत्ताची (मिनिट्स बुक) तब्बल दहा महिने कोणतीही नोंदच ठेवली गेली नसल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित दोषींवर स्वतंत्रपणे जबाबदारी निश्चित करण्याची कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही अद्याप का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ चौकशी समिती नेमून यापूर्वी झालेल्या अक्षम्य बाबींची आणि गैरप्रकारांची जबाबदारी संपणार आहे का, असा संतप्त सवाल विचारत, संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका तपासून त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई होणार की नाही, याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी समिती स्थापन करणे ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया असली, तरी त्यापूर्वी झालेल्या गंभीर चुकांवर BDO कार्यालय नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कामांमधील कथित त्रुटींवरही स्वतंत्र चौकशी व कारवाई होणार का, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. चौकशीच्या नावाखाली हे प्रकरण केवळ पुढे ढकलून वेळकाढूपणा केला जाणार की जबाबदार व्यक्तींवर नियमाप्रमाणे कारवाई होणार, असा जाब चव्हाण यांनी CEO यांच्याकडे विचारला आहे.

दहा महिन्यांच्या मिनिट्स बुकच्या नोंदी न करणाऱ्या ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना लांजा BDO पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त होत असून, आता यावर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि लांजा प्रशासन काय निर्णय घेते याकडे समस्त हर्दखळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
📲Get App