🔥 TRENDING Jharkhand HC Rules Bail Does Not Precl... CBI Launches Probe into Death of Jhark... India Aims for $10 bn Investment to Se... PM Modi to Attend Redevelopment Ceremo... Rupee Reaches Seven‑Month High on Surg... Barmer Police Arrest Wanted Criminal K...
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

घोड धरणात प्रशासनाची धडक कारवाई; ८ सेक्शन आणि ९ फायबर बोट्स नष्ट करत वाळू तस्करांचे धाबे दणाणले!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 16 Nov 2026, 10:05 PM 👁 21
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शिरूरचे तहसीलदार बाळसाहेब मसके आणि श्रीगोंदाचे तहसीलदार सचिन डोंगर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व शिरूर पोलिसांनी संयुक्त मोहीम

घोड धरणात प्रशासनाची धडक कारवाई; ८ सेक्शन आणि ९ फायबर बोट्स नष्ट करत वाळू तस्करांचे धाबे दणाणले!

पुणे प्रतिनिधी : 16 नोव्हेंबर 2026
शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील घोड धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. शिरूरचे तहसीलदार बाळसाहेब मसके आणि श्रीगोंदाचे तहसीलदार सचिन डोंगर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व शिरूर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली.
या कारवाईदरम्यान घोड धरणात अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तब्बल ८ सेक्शन आणि ९ फायबर बोट्स जागेवरच फोडून धुळीस मिळवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते तसेच पर्यावरणाचाही ऱ्हास होत होता. या दणकट कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रशासनाने या माध्यमातून वाळू माफियांना सज्जड इशारा दिला आहे की, अवैध धंद्यांवर कायद्याचा बडगा असाच कठोरपणे उगारला जाईल आणि कोणत्याही माफियांना पाठिशी घातले जाणार नाही. या मोहिमेत महसूल व पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
📲Get App