🔥 TRENDING Shraddha's 'Eetha' track 'Ji Ji Re Ji'... Poet Javed Akhtar Claims Lord Ram in E... Supriya Pilgaonkar’s Film 'Tu Aahes Na... India's Longest Vande Bharat Train Now... Goa Assembly Schedules One-Day Session... Nagaland State Lottery Draw Live at 1 ...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

गावेराई एसटी, आगारातील आरक्षण केंद्राचा काम थांबले

✍️ Reporter: Ramesh Sukhdev Khandagale 🗓 18 Nov 2026, 06:21 PM 👁 33
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गावेराई एसटीच्या आगार भागातील आरक्षण केंद्राचे बांधकाम काम सध्या थांबलेले आहे.

गेवराई : गेवराई एसटी आगारामध्ये (बसस्थानकात) प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण केंद्र सुरू करण्याची व्यवस्था होऊनही एक वर्ष उलटले, तरी प्रत्यक्ष आरक्षण केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट काढू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेवराई हे तालुक्याचे ठिकाण असून येथून बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर आदी ठिकाणांसाठी दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या मोठी आहे. सण-उत्सव, सुट्टीच्या काळात जागेसाठी धावपळ होते. अशा वेळी आरक्षण केंद्र असते तर प्रवाशांना निश्चित जागा मिळाली असती.

कर्मचारी नियुक्ती, संगणक यंत्रणा, तांत्रिक जोडणी की वरिष्ठ पातळीवरील परवानगी - नेमके काय अडले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रवाशांची मागणी आहे की, प्रशासनाने याबाबत तातडीने खुलासा करावा आणि आरक्षण केंद्र तात्काळ कार्यान्वित करावे.
📲Get App