🔥 TRENDING सिकंदराराऊ में धूमधाम से निकली मां भगव... वेलतूर येथे विजयादशमी व दसऱ्याचा उत्स... Karnataka CM Shivakumar Urges Minister... Vande Bharat Express to Link Bengaluru... Priyank Kharge urges RSS to approve Vi... Lawrence Bishnoi jailed as shadow cabi...
21 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे दसरा निमित्त वैद्यकीय सामग्रीचे शस्त्रपूजन संपन्न...

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 20 Oct 2026, 11:16 PM 👁 44
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे दसरा निमित्त वैद्यकीय सामग्रीचे शस्त्रपूजन संपन्न...

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २०/१०/२०२६
मुरबाड ठाणे विशेष वृत्त
टोकावडे, ता. मुरबाड जि. ठाणे विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या शुभ दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय, टोकावडे येथे परंपरेनुसार वैद्यकीय सामग्रीचे शस्त्रपूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले.

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येऊन आपल्या दैनंदिन वापरातील शस्त्रांचे पूजन केले.

#पूजनाचा_मुख्य_उद्देश -
आपल्या शास्त्रात सांगितले आहे - 'शस्त्र हेच शास्त्र'. सीमेवर जवानाची बंदूक जशी त्याचे शस्त्र, तसेच रुग्णालयात डॉक्टरांचे स्टेथोस्कोप, सर्जनचे सर्जिकल किट हेच त्यांचे खरे शस्त्र आहे. वर्षभर ज्या साहित्याच्या साहाय्याने आपण रुग्णांचे प्राण वाचवतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या पूजनामागचा हेतू.

काय काय पूजन करण्यात आले

यावेळी रुग्णालयातील प्रमुख तीन विभागातील साहित्याची विधिवत पूजा करण्यात आली.

◆ ऑपरेशन थिएटर (OT) विभाग:
ऑपरेशन टेबल, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट किट, ऑटोक्लेव्ह मशीन, सक्शन मशीन, ऑक्सिजन सिलेंडर, आणि इमर्जन्सी लाईट यांचे हळद-कुंकू, फुले वाहून पूजन करण्यात आले.

◆ बाह्य रुग्ण विभाग (OPD)
OPD मध्ये वापरले जाणारे स्टेथोस्कोप, बी.पी. मशीन, थर्मामीटर, तपासणी टेबल, वजन काटा आणि औषध साठा यांचे पूजन करण्यात आले.

◆ दैनंदिन वापर व इतर साहित्य:
रुग्णालयातील रुग्णवाहिका (१०८), लॅब मधील मायक्रोस्कोप, एक्स-रे मशीन, कॉम्प्युटर, रजिस्टर, तसेच स्वच्छतेसाठी वापरले जाणारे साहित्य यांचीही पूजा करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीकारी यांच्या हस्ते देवी सरस्वती आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व साहित्याला हार घालण्यात आले.

याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय एमडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. घोलप सर अधिपरिचारिका, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, "आमच्यासाठी दसरा म्हणजे फक्त सुट्टी नाही. आमची खरी शस्त्रे म्हणजे ही वैद्यकीय उपकरणे आहेत. त्यांची निगा राखणे, त्यांना वेळेवर सॅनिटाईज करणे हेच आमचे खरे पूजन. आजच्या पूजनाने आम्हाला वर्षभर रुग्णसेवा करण्याची नवी ऊर्जा मिळते."

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि रुग्णसेवेचा हा वसा असाच अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला....
📲Get App