🔥 TRENDING Navi joining police સાવર કુંડલામાં ભારે વરસાદ પડ્યો Great Barbet suffers seizure, leaves c... Nagaland's Quest for Peace Through Dev... Madhya Pradesh Lokayukta clamps down o... Patwaris in Mandla Protest Against SDM...
18 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

गणेश उत्सवानिमित्त ओतूर मार्केटमध्ये समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 18 Sep 2026, 09:45 PM 👁 19
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर या ठिकाणी समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन झाले, कीर्तनातून महाराजांनी काही सूचना केल्या त्यामध्ये पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजे दुसरी गावाची प्रगती राजकारण विरहित झाली पाहिजे तरुण मुलांना मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे व ठराविक काळामध्ये लोकांनी परमार्थ कडे वळली पाहिजे अशा अनेक उदाहरणे देत लोकांना समाज प्रबोधन महाराजांनी केले चालू जीवनावर दाखले देत महाराजांनी लोकांना हसवले
या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार श्री शरद सोनवणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रकाश नाना ताजणे. श्री तुषार भाऊ थोरात. सौ. प्रियंका ताई शेळके. श्री वारुळे. श्री गडगे. आदी मान्यवर उपस्थित होते महाराजांचा सत्कार झाल्यानंतर संपूर्ण गणेश भक्तांना महाप्रसाद सर्व अडतदारांच्या वतीने ठेवण्यात आला होता. महाराजांनी चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन केले मंडळाच्या वतीने अजून शालेय मुलांची सांस्कृतिक कार्यक्रम. भजन. महिलांसाठी होम मिनिस्टर भव्य मिरवणूक देखावे अशा अनेक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली.
📲Get App