🔥 TRENDING સાબરકાંઠા: પરિણીતાની હત્યાના ગુનામાં પ... ઊંઝા-પાટણ રોડ પર કાર અને એક્ટિવાની ટક્... Heavy Rain Alert Issued for Arunachal... Sikkim Chief Minister urges boost to A... Sikkim Government to Allocate Land for... Mizoram Unveils ‘Pluck & Pay’ Festival...
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

गणपतीपुळे येथील भाद्रपदी गणेशोत्सवाची २१०० भाविकांच्या महाप्रसादाने सांगता

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 23 Sep 2026, 07:28 PM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात आयोजित भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता वामन द्वादशीच्या दिवशी महाप्रसादाने झाली. या उत्सवात सुमारे २१०० भाविकांनी सहभाग घेतला.

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता बुधवारी वामन द्वादशीच्या पवित्र दिनी महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात करण्यात आली. या महाप्रसादाचा सुमारे २१०० भाविकांनी लाभ घेतला. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांसह विविध भागांतून गणपतीपुळ्यात दाखल झालेल्या भाविक आणि पर्यटकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या कालावधीत श्रींची महापूजा, दररोज आरती, मंत्रपुष्प तसेच सुश्राव्य कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी श्रींची पालखी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून वाजतगाजत काढण्यात आली. भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पालखी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय झालेल्या या उत्सवाची बुधवारी वामन द्वादशीच्या दिवशी महाप्रसादाने सांगता झाली. सकाळपासूनच महाप्रसादासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. सुमारे २१०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत उत्सवाची सांगता भक्तिभावाने केली.

भाद्रपदी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी देवस्थान समितीची पंच कमिटी, पुजारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे संपूर्ण उत्सव सुरळीतपणे पार पडला.
📲Get App