🔥 TRENDING કેબીનેટ મંત્રી ભુપેન્દ્ર યાદવના હસ્તે... ಸಂಘಟನೆ–ಶಿಕ್ಷಣ–ಆರೋಗ್ಯ–ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಆದ್ಯತ... Himachal Educators Rally to Safeguard... Times Now Navbharat Survey: Dhami Gove... Chef Narendra Singh Launches Authentic... Uttarakhand CM Dhami Praises Modi, Hig...
14 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

एसटीच्या ताफ्यात ५ हजार नव्या 'लालपरी' दाखल होणार; टाटा मोटर्स ठरली सर्वात कमी बोलीधारक....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 13 Sep 2026, 08:15 PM 👁 31
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

मुंबई - महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. ग्रामीण महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्याच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी ५ हजार नव्या 'लालपरी' बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

गुणवत्तेशी तडजोड नाही - सरनाईक

या निविदा प्रक्रियेत देशातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने सर्वात कमी दराचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे बसेसच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नव्या ५ हजार बसेस दाखल झाल्यामुळे एसटीला मोठे बळ मिळणार आहे. सध्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बसेसचा प्रश्न गंभीर आहे. वारंवार बस बंद पडण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. नवीन ताफ्यामुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल, फेऱ्यांची संख्या वाढेल आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळेल. पुढील सहा महिन्यांत ५ हजारांहून अधिक जुन्या बसेस सेवेतून बाद होणार आहेत.

आतापर्यंत २६४० लालपऱ्या दाखल

एसटीने आधुनिकीकरणाचा कार्यक्रम यापूर्वीच सुरू केला आहे. २ बाय २ आसन व्यवस्था असलेल्या २,६४० 'लालपरी' बसेस आधीच ताफ्यात दाखल झाल्या आहेत. याशिवाय ३ बाय २ आसन व्यवस्था असलेल्या ३ हजार 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण आणि सक्षम होत आहे.

'मागेल त्याला बसफेरी' धोरण

नव्या बसेस आल्यानंतर 'मागेल त्याला बसफेरी' देण्याचा महामंडळाचा मानस आहे. बसफेरीचा नफा-तोटा दुय्यम असून, मागणी करणाऱ्या गावांनी किंवा संस्थांनी ती फेरी तोट्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्र्यांनी यावेळी केले.

ई-बस युगाकडे वाटचाल

हा टप्पा डिझेलवरील पारंपरिक एसटी बसेसच्या युगातील शेवटचा मोठा टप्पा मानला जात आहे. यापुढे एसटी महामंडळाचा भर पूर्णपणे पर्यावरणपूरक ई-बसेसवर असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधांसोबतच पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्टही साध्य होणार आहे.

लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा आधार असलेल्या एसटीच्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.
📲Get App