🔥 TRENDING एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही; रा... ग्रेटर नोएडा के टिगरी गोल चक्कर पर पैं... IMD Issues Heavy Rain Alerts and Thund... Kerala PG Homoeopathy 2026 Application... Telangana Man Arrested for Cheating Wo... Six vehicles damaged in chain collisio...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
एलसीबीची धडाकेबाज कारवाई : धरणगावातून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत, मध्य प्रदेशातील आरोपी कजगावातून जेरबंद...!!

एलसीबीची धडाकेबाज कारवाई : धरणगावातून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत, मध्य प्रदेशातील आरोपी कजगावातून जेरबंद...!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 Oct 2026, 10:00 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

कजगाव येथून अटक, २५ हजारांची होंडा शाईन जप्त

धरणगाव, जि. जळगाव - धरणगाव बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) काही दिवसांतच शोधून काढली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील एका सराईत गुन्हेगाराला कजगाव (ता. भडगाव) येथून अटक करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसात तक्रार दिली होती. दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली काळ्या रंगाची होंडा सीबी शाईन (MH-19-DL-0268) ही दुचाकी धरणगाव बस स्थानकासमोरील रस्त्यावर पार्क केली होती. पंचायत समितीत कामानिमित्त जाऊन सायंकाळी साडेपाच वाजता परत आले असता, दुचाकी जागेवर नव्हती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.नं. ३६७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी एक विशेष तपास पथक नियुक्त केले.

तपास पथकाने घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपीचा माग काढला. आरोपी मनोज केदार बारेला (रा. हुगाने, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) हा कजगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. राहुल गायकवाड, सहा. पो.नि. संतोष पवार, पो.अंमलदार विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, हरिलाल पाटील, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील, राहुल सोनी, महेश सोमवंशी, गोपाळ पाटील, नितीन कोळी तसेच तपासी अंमलदार जितेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.
📲Get App