🔥 TRENDING Madhya Pradesh receives ₹90,000 crore... Protest If Venkatesh Galag's Transfer... ആടിന് ഫയർഫോഴ്സിന്റെ 'സി.പി.ആർ'; ജീവൻ ത... 75 वर्षीय नाना पाटेकर का निधन भारी वर्षा से जलमग्न हुई सड़कें, जनजीव... कटनी जिले के ढीमरखेड़ा में nsui और कां...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियातर्फे ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ देसले 'डिजिटल इंडिया अवॉर्ड'ने सन्मानित
Lifestyle

डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियातर्फे ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ देसले 'डिजिटल इंडिया अवॉर्ड'ने सन्मानित

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 08 Oct 2026, 05:01 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियातर्फे ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ देसले 'डिजिटल इंडिया अवॉर्ड'ने सन्मान.
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक ८/१०/२०२६
ठाणे मुरबाड विशेष वृत्त : डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात 'Need24News' (ठाणे) चे ज्येष्ठ पत्रकार श्री. काशिनाथ देसले यांना या वर्षाचा मानाचा 'पत्रकारिता पुरस्कार २०२६' (डिजिटल इंडिया अवॉर्ड २०२६) देऊन गौरवण्यात आले. हा दिमाखदार सोहळा मलकापूर (जि. बुलढाणा) येथे संपन्न झाला.
श्री. काशिनाथ देसले यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक, ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर अत्यंत निर्भीडपणे पत्रकारिता केली आहे. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले. त्यांच्या याच उल्लेखनीय आणि अविरत पत्रकारितेची दखल घेत डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मलकापूर येथील कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते श्री. देसले यांना सन्मानचिन्ह, शाल आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सोहळ्यात डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने इतरही विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे वृत्त किशोर पवार (तालुका प्रतिनिधी, मुरबाड) यांनी दिले आहे.
📲Get App