🔥 TRENDING પાક માં ભારે નુકસાન મહેમદાવાદ તાલુકાના હલધરવાસ કોઠીપુરા. ચ... इस्लामपुर वार्ड 16 को परिसीमन सूची में... वाराणसी में चाइनीज मांझे के खिलाफ जन ज... रामसिंह शेखावत ने रूपपुरा में ग्राम वि... माननीय मुख्यमंत्री श्री सम्राट चौधरी ज...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
डोंबिवलीतील व्यापाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी ५१ लाखांचा निधी सुपूर्द
Local

डोंबिवलीतील व्यापाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी ५१ लाखांचा निधी सुपूर्द

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 14 Oct 2026, 12:18 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेसाठी डोंबिवलीतील व्यापारी वर्गाने सामाजिक बांधिलकी जपत मोठा पुढाकार घेतला आहे. नवरात्रोत्सवाचा खर्च कमी करून ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना डोंबिवलीतील व्यापारीवर्गाने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीत सामाजिक भान जपणाऱ्या दातृत्वाचा प्रत्यय येत आहे. नवरात्रौत्सवाचा बडेजाव आणि खर्च कमी करून तो निधी दुष्काळग्रस्तांना द्यावा, या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला डोंबिवलीतील व्यापारीवर्गाने ५१ लाखांची मदत करून साद दिली.

डोंबिवलीतील प्रसिद्ध नमो रमो नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल ५१ लाख रुपयांचा निधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचप्रमाणे नमो रमो नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी दिले. ही एकूण मदत ५ लाख इतकी आहे. मदतीचा हा ओघ नवरात्रीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दुष्काळग्रस्तांसाठी सुरूच राहणार आहे.

दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी आपले एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी दिले. या वेतनाचा एकत्रित धनादेश भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सुपूर्द केला. यासोबतच भाजपा ठाणे विभाग प्रसिद्धीप्रमुख तथा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी एक लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली. संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीला धावून जाणे ही महाराष्ट्राची परंपराच आहे. याच भावनेतून भाजपा कल्याण-डोंबिवली परिवाराने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

डोंबिवलीकरांच्या या उत्सव आणि सामाजिक भान यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डोंबिवली क्रीडा संकुलात गेल्या अनेक वर्षांपासून नमो रमो गरब्याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा म्हणून या गरब्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे याठिकाणी वातानुकुलित गरब्याचा आनंद गरबाप्रेमींना घेता येतो.
📲Get App