🔥 ट्रेंडिंग अररिया में 20 महिला पर्यवेक्षिका पदों... 15 ਅਕਤੂਬਰ ਨੂੰ ਪੰਜਾਬ ਬੰਦ! शुकुल बाजार में स्कूली बच्चों की सुरक्... અશ્વિનીકુમાર પોલીસ સ્ટેશને BRTS બસ સ્ટ... संजय यदुवंशी को बड़ा झटका! अग्रिम जमान... थाना सिगरा पुलिस ने नाबालिग अपहृता को...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई; २३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, परवाना निलंबित....!!!

छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई; २३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, परवाना निलंबित....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 अक्टू. 2026, 06:38 PM 👁 10
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत जुना मोंढा परिसरातील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या ऑईल री-पॅकिंग युनिटवर धाड टाकून प्रशासनाने तब्बल १२ हजार ३८२ किलो संशयास्पद खाद्यतेल जप्त केले आहे. जप्त केलेल्या तेलाची एकूण किंमत २३ लाख ३५ हजार ६५४ रुपये इतकी असून, संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल. झाडे, झोन-२ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान कारखान्यातील प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचे समोर आले आहे.

२०६ पैकी केवळ १० गुण, कारखाना 'अपात्र' घोषित

प्रशासनाने केलेल्या पाहणीत या कंपनीला अन्न सुरक्षा मानकांच्या २०६ पैकी केवळ १० गुण म्हणजेच ५ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे या युनिटला 'नॉन-कॉम्प्लायन्स' अर्थात अपात्र घोषित करण्यात आले.

कारखान्याच्या छतावर कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ शौचालये, जमिनीवर थेट ठेवलेले तेलाचे डबे आणि सर्वत्र सांडलेल्या तेलामुळे तेलकट व घसरडी झालेली फरशी असे विदारक चित्र अधिकाऱ्यांना दिसून आले. कीटक आणि उंदीर रोखण्यासाठी खिडक्यांना जाळ्या व ट्रॅप्स नव्हते. कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती, तसेच काम करताना कॅप, अ‍ॅप्रन व हातमोज्यांचा वापरही केला जात नव्हता. तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी लॅब किंवा फूड टेक्नॉलॉजिस्टही उपलब्ध नव्हता. तसेच खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची बिले व नोंदी दाखवण्यात कंपनी असमर्थ ठरली.

जप्त केलेला साठा

केशर गोल्ड ब्रँड रिफाइंड सोयाबीन तेल (डबे व कॅन) - ४०७.९ किलो, किंमत ८५,९७० रु. '
सुटे रिफाइंड सोयाबीन तेल (स्टोरेज टँक क्र. ६) - ७,९८८.४ किलो, किंमत १४,८५,८४२ रु.

सुटे रिफाइंड सोयाबीन तेल (स्टोरेज टँक क्र. २) - २,९८८.४ किलो, किंमत ५,५५,८४२ रु.

केशर गोल्ड ब्रँड रिफाइंड पामोलीन तेल - ७९ किलो, किंमत १७,६०० रु.

या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी सणांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या अशा बेकायदेशीर आणि अस्वच्छ अन्न प्रक्रिया केंद्रांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
📲Get App