अपराध
चंद्रपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; पोलिसांकडून युद्धपातळीवर तपासणी, मॉक ड्रिलची चर्चा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनासह न्यायालयीन परिसरात एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय करत न्यायालय परिसरात तपासणी मोहीम राबवली.
ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जिल्हा न्यायालयातील कर्मचारी, वकील आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातून बाहेर काढले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) न्यायालयाच्या इमारतीची, कानाकोपऱ्याची तसेच पार्किंग परिसराची कसून तपासणी केली.
या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई प्रत्यक्ष बॉम्बच्या धमकीवरील सुरक्षा तपासणी होती की नियोजित मॉक ड्रिल, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली.
मात्र, संबंधित पोलिस प्रशासनाकडून मॉक ड्रिल असल्याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आल्याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या ई-मेलच्या सत्यतेबाबत आणि संपूर्ण घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारची धमकी मिळणे ही गंभीर बाब असून, अशा घटनांमध्ये नागरिकांची सुरक्षितता आणि सुरक्षा यंत्रणेची तत्परता अत्यंत महत्त्वाची आहे.