🔥 TRENDING એન.એચ. 48 પર શેરિંગ રિક્ષામાં મુસાફરોન... Pakke Kessang becomes first Arunachal... Jammu Divisional Commissioner and Mult... અમદાવાદની અનેક સ્કૂલોને ફરીથી બોમ્બની... Jammu & Kashmir Announces Major IAS an... J&K Government Announces Major Reshuff...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ
Crime

चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 19 Jul 2026, 04:02 PM 👁 147
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रात्री ३ वाजता भोरटेक CT पाटील कॉलनीतील तीन घरांमधून चोरट्यांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरले,.

कजगावजवळील भोरटेक CT पाटील कॉलनीत सुमारे ३ वाजता तीन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने लूटले.

पहिल्या घरात, फारूक हाजी सलीम खाटीक यांच्या घरात सुमारे ३० हजार रुपये रोख रक्कम चोरली गेली. दुसऱ्या घरात भैय्या एकनाथ मिस्त्री (फौजी) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक करण्यात आली. तिसऱ्या घरात राकेश नटराज पाटील यांच्या घराचा सुरक्षा गेट कटरने तोडून चांदीचे दागिने चोरले गेले.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल दत्तू पाटील घटनास्थळी पोहोचून पंचनामा तयार केला व तपास सुरू केला. पोलिस परिसरातील माहिती संकलित करत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

कजगाव परिसरात यापूर्वीही चोरी व दरोड्याच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. नागरिकांनी किमान दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती व रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी केली असून पोलिस चौकीत सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे.
📲Get App