🔥 TRENDING फतेहपुर के कुचेसर रोड पर शिक्षा समारोह... फतेहपुर के कुचेसर रोड पर शिक्षा समारोह... Goa College Launches Course on Healthy... हजारीबाग में बरही चौक पर स्कूल बच्चों... Inspection of Comba Wells Cancelled, R... Goa Police Inspector Arrested in Minor...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नारायण दाभाडे अखेर जेरबंद!

चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नारायण दाभाडे अखेर जेरबंद!

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 08 Oct 2026, 04:58 PM 👁 735
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

१३ गंभीर गुन्ह्यांची नोंद; गुन्हे शाखा युनिट-४ची शिताफीने कारवाई

मोठी कारवाई

चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नारायण दाभाडे अखेर जेरबंद!

१३ गंभीर गुन्ह्यांची नोंद; गुन्हे शाखा युनिट-४ची शिताफीने कारवाई

वडगाव (मावळ) : गंभीर गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेला आणि तळेगाव दाभाडे व मावळ परिसरातील विविध गुन्ह्यांमध्ये नाव असलेला नारायण सोपान दाभाडे (वय ४१) याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पथकाने जेरबंद केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, दाभाडे हा उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ५९६/२०२३ मधील आरोपी असून त्याच्यावर भादंवि कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दाभाडे याचा माग काढला. तो जांभुळगाव परिसरात असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या नोंदीनुसार, दाभाडे याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी, अपहरण, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्स लुटीचा कट, दरोड्याचा प्रयत्न आणि गांजा विक्री यांसह एकूण १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

👮‍♂️ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार असवले, पोलीस हवालदार सोनटक्के आणि पोलीस शिपाई बाबाराजे मुंडे यांनी सहभाग घेतला.

फरारी आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-४ने केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
📲Get App