🔥 TRENDING J&K Higher Education Department Issues... J&K Finance Department Shifts Treasury... Srinagar MP rebuts NC, challenges Omar... Finance Minister Harpal Cheema Attends... Madhya Pradesh High Court Declares 10%... Bhopal businessman extorted ₹40 lakh i...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

चाकणच्या ऐतिहासिक किल्ल्यात मोठा शोध, संग्रामदुर्ग किल्ल्यात सापडला अनमोल ऐतिहासिक

✍️ Reporter: Vinayak Eknath Mugale 🗓 04 Nov 2026, 11:12 AM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चाकण च्या सग्राम दुर्ग मध्ये खोदकाम करतानी सापडले पुरातन शिता राम मूर्ती भगवान शिव ची मूर्ती

उत्खननात सापडलेल्या भगवान शिव-पार्वती आणि प्रभू श्रीराम यांच्या प्राचीन मूर्तींची पाहणी केल्यानंतर त्या श्री दामोदर मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या माध्यमातून परिसरातील प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

संग्रामदुर्गाच्या इतिहासावर पडणार नवा प्रकाश

चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्या शौर्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा ऐतिहासिक किल्ल्याच्या उत्खननात प्राचीन मूर्ती सापडणे ही महत्त्वाची बाब आहे.

या शोधामुळे संग्रामदुर्ग किल्ल्यावरील मातीत दडलेला इतिहास नव्याने समोर येत आहे. या मूर्तींचा नेमका कालखंड, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचा किल्ल्याशी असलेला संबंध याबाबत पुढील पुरातत्त्वीय अभ्यासातून अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चाकणच्या ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या ही मृर्ती पाहण्यासाठी देखील अनेक शिवप्रेमी गर्दी करत आहेत
📲Get App