बसचा ब्रेक फेल होऊन अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३५ विद्यार्थ्यांचा बचाव..
चालकाचे प्रसंगावधान
विभागीय प्रतिनिधी
पंचवटी : पडसाद मूकबधिर विद्यालयाची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पंचवटीतील गोधाघाट परिसरात आली असता अचानक बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याची घटना शनिवारी (दि. १२) दुपारी घडली. चालक विकास हरिभाऊ दिवे यांनी प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र या अपघातात एक महिला जखमी झाली.
पडसाद मूकबधिर विद्यालयाची बस (एमएच १५ ए.के. १४२८) सिडको परिसरातून विद्यार्थ्यांना पंचवटीत सोडण्यासाठी आली होती. गोधाघाट परिसरात पोहोचल्यानंतर अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि स्टेअरिंग लॉक झाले. परिस्थिती लक्षात येताच चालक दिवे यांनी बस रस्त्याच्या एका बाजूला वळवून मोठा अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बसने गोधापार्क परिसरातील पझऱ्याच्या शेडला धडक दिली. या धडकेत बसमधील महिला अंकिता मनोहर जाधव (वय ३२, रा. दुर्गानगर, पेठ रोड) जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
बसच्या अपघातानंतर बसमधील सर्व ३५ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी अंकिता जाधव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील तसेच गुन्हे शोध पथक व गोपनीय शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.