🔥 TRENDING Nashik FDA Seizes 2,450 kg of Chicken for Saf... शामली के कांधला में लोहरीपुर के किसान... Coastal Karnataka: A Must-Visit Destin... India Adds 796 New Bunkers to Border S... Nagaland MP Calls for Swift Repair of...
11 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

ब्रेकिंग न्यूज: वनमंत्री गणेश नाईक यांच्या 'पावनगड' शासकीय निवासस्थानाला भीषण आग; संपूर्ण बंगल्यात धुराचे लोट!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 11 Nov 2026, 04:19 PM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ब्रेकिंग न्यूज: वनमंत्री गणेश नाईक यांच्या 'पावनगड' शासकीय निवासस्थानाला भीषण आग; संपूर्ण बंगल्यात धुराचे लोट!
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे. सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
मुंबई, दि. १२/११/२०२६ :
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या मुंबईतील मंत्रालयासमोरील 'पावनगड' या शासकीय निवासस्थानाला आज आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर कंडिशनरमध्ये (AC) झालेल्या बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आणि संपूर्ण बंगल्यात धुराचे लोट पाहायला मिळाले. यामुळे 'पावनगड' परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत धूर बाहेर काढला आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत निवासस्थानाच्या एका भागातील खिडक्यांच्या काचा फुटल्याचे आणि काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी मंत्री गणेश नाईक निवासस्थानी उपस्थित नव्हते आणि या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
📲Get App