🔥 TRENDING ग्वालियर में 'जय भोले नाश्ता' का सड़क... शिवपुरी: कोर्ट रोड को अतिक्रमण मुक्त ब... CISF Camp Firing Incident Reported Fire Breaks Out at Balasore Showroom,... Odisha Bandh Leaves Passengers Stuck a... Congress Protests in Raikot Over Alleg...
30 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

बारा वर्षांच्या अतिक्रमणाला अखेर ब्रेक; अजिंठा चौफुलीवर महापालिकेचा बुलडोझर, परिसराला छावणीचे स्वरूप...!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 30 Sep 2026, 06:40 PM 👁 10
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनीधी


जळगाव - शहरातील अजिंठा चौफुलीजवळ महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर गेली अनेक वर्षे थाटलेला भंगार बाजार अखेर जमीनदोस्त करण्यात आला. बुधवारी महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत अतिक्रमणावर कारवाईचा हातोडा चालवला. या कारवाईत अनधिकृतपणे उभारलेली दुकाने आणि पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली.

महापालिकेच्या मालकीच्या या जागेवर मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याचा साठा करून पक्की दुकाने थाटण्यात आली होती. प्रशासनाने यापूर्वी जागेची पाहणी करून संबंधितांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र नोटिसांकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण कायम ठेवण्यात आल्याने थेट कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी सकाळपासूनच महापालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तामुळे काही काळ संपूर्ण अजिंठा चौफुली परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कारवाई सुरू होताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

बारा वर्षांपासून महसूल बुडवून जागेचा वापर

धक्कादायक बाब म्हणजे या जागेच्या वापराचा करार संपून तब्बल बारा वर्षांचा कालावधी लोटला आहे. करार संपूनही बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू राहिल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

या कारवाईनंतर आता रिकाम्या झालेल्या जागेचा वापर नेमका कशासाठी होणार? महापालिका तेथे कोणता नवीन प्रकल्प उभारणार? आणि पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कोणती कायमस्वरूपी उपाययोजना करणार? याकडे संपूर्ण जळगावकरांचे लक्ष लागले आहे. या कारवाईनंतर शहरातील इतर अतिक्रमित जागांवरही हातोडा पडणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आढाव यांनी अरेरावी केल्याचा प्रकार घडला. चित्रीकरणावेळी झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पत्रकारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
📲Get App