🔥 TRENDING पूर्णिया सांसद पप्पू यादव का ऐलान: एक... Bengal vs Jharkhand: BGL vs JHA Match... Gold Prices Drop Sharply Post-Diwali:... Spanish Police Set Guinness Record wit... New Zealand Targets World Cup Success... 14 Jail Inmates Seized with 12 Mobile...
12 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भाऊबीजेनिमित्त भव्य सांस्कृतिक लोकप्रबोधन सोहळा !

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 12 Nov 2026, 04:36 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भाऊबीजेनिमित्त भव्य सांस्कृतिक लोकप्रबोधन सोहळा !

भाऊबीजेनिमित्त भव्य सांस्कृतिक लोकप्रबोधन सोहळा !

📍 सरकोली, पंढरपूर

भाऊबीजेच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे गावातील माताभगिनी आणि नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक लोकप्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी महिला वर्षभर मनापासून कष्ट घेत असतात. विशेषतः दिवाळीसारख्या सणांच्या काळात घराची स्वच्छता, फराळाची तयारी, पाहुण्यांचे स्वागत अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांची मोठी धावपळ होते. या सगळ्यात त्यांना स्वतःसाठी निवांत वेळ मिळणेही कठीण असते. त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्या माताभगिनींना थोडा विरंगुळा मिळावा, त्यांना मनोरंजनाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, या उद्देशाने अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. लोककलेच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमाला पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे, मोहोळ मतदार संघाचे आमदार राजू खरे उपस्थित होते. याप्रसंगी या सुंदर उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल श्री. दत्ताभाऊ भोसले मित्र परिवार तसेच श्री भैरवनाथ ग्रामविकास समविचारी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. सरकोलीकरांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

#Pandharpur #Folk_प्रबोधन #NagrajManjule #सांस्कृतिक #SocialWork
📲Get App