🔥 TRENDING 52 illegal teak logs seized in MP tige... Two Rajasthan Youths Arrested in Ratla... Serampore Police Officer Asi Nitun Cha... କଲେଜ ନିର୍ବାଚନ: ଶୈଳବାଳା ମହିଳା ମହାବିଦ୍ୟା... જગડિયા રોડ પર ગુમાનદેવ નજીક મોડી રાત્ર... लागवड केलेल्या भातशेतीला भेगा! ठाणे जि...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याच्या जागीच मृत्यू

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 12 Oct 2026, 10:28 AM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याच्या मृत्यू महामार्गावर खळबळ

*धुळे -* मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव शिवारात काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला. अजमेरा कॉलेज परिसरात अॅड. शामकांत पाटील यांच्या शेताजवळ भरधाव ट्रकने नर बिबट्याला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर बिबट्या जागीच गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सामाजिक कार्यकर्ते जगन बैसाणे यांनी वन विभागाला याची माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत बिबट्या 3 ते 4 वर्षांचा नर असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपासासाठी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
📲Get App