🔥 ट्रेंडिंग सुप्रीम कोर्ट के न्यायमूर्ति ने कहा, ए... रहूँगा झंडा नारा स्थानीय स्तर पर सुना... रajasthan हाई कोर्ट ने एसटी महिला को प... गगहा में रविकेश हत्याकांड दुल्कर सलमान की 'आकाशंलो ओका तारा' ने... समीर रैड्ड ने कहा: दक्षिणी सिनेमा ने ब...
22 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्वास्थ्य

भोरमध्ये पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकाळपासूनच लहान बालकांची बूथवर गर्दी

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 22 नव. 2026, 10:15 AM 👁 66
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर, पुणे : राज्यभरात आज राबविण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला भोर तालुक्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सकाळपासूनच शहरातील विविध पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांवर पालक आपल्या लहान बालकांना पोलिओचा डोस देण्यासाठी घेऊन येत आहेत.

आज उपजिल्हा रुग्णालय, भोर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता सकाळपासूनच लसीकरणासाठी पालकांची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रातच उपजिल्हा रुग्णालयातील बूथवर सुमारे १५ बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आल्याची माहिती मिळाली.
भोर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
आपले बालक पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी कोणताही हलगर्जीपणा न करता जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या बालकाला पल्स पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राहावे, यासाठी या मोहिमेत प्रत्येक पालकाने सहभागी होणे गरजेचे आहे.
📲Get App