🔥 TRENDING Karnataka Raises ASHA Workers’ Monthly... KPTCL Rescues Black Kite Trapped on 40... Karnataka to adopt Japan's urban trans... बोलेरो की टक्कर से बाइक सवार युवक की म... Speeding Car Soars 30 Feet Before Fata... Pakistan A to Face Sri Lanka A in 2026...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोरमधील निळकंठ या ठिकाणी माजी सैनिक यांच्यावर सासृनैनांनी अंत्यसंस्कार

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 29 Nov 2026, 06:15 PM 👁 72
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर, पुणे : भोरच्या विसगाव खोऱ्यातील निळकंठ ता.भोर येथील माजी सैनिक तसेच पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले वसंत लक्ष्मण राऊत वय - ५२ (पोलीस हवालदार) यांच्यावर साश्रू नयनांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी भोर- राजगड माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानवंदना दिली.
माजी सैनिक वसंत राऊत शालेय जीवनापासूनच उत्कृष्ट खेळाडू असल्याने त्यांनी विविध प्रकारच्या खेळांना प्राधान्य देत तरुण घडवण्याचे काम केले.तर अठरा वर्ष १९ मराठी बटालियन या खात्यात आदर्श सैनिक म्हणून त्यांनी काम पाहिले.मिलिटरी मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस खात्यात पुन्हा एकदा त्यांनी पदार्पण केले.मागील दहा वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत होते.वसंत यांच्या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अंत्यदर्शनासाठी नागरिक,नातेवाईक,मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यावेळी उपस्थितांनी अश्रृंनी आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत राऊत यांना श्रद्धांजली अर्पण केली.देशसेवेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा वारसा जपणाऱ्या य व्यक्तीला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते.ईश्वर दिवंगत वसंत यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा टापरे,सचिव मोहन उभे,कोषाध्यक्ष भगवान मालूसरे,तुकाराम मैद तसेच बहुतांशी सदस्य उपस्थित होते.
📲Get App