🔥 ट्रेंडिंग मोंगरा गांव स्थित प्राचीन वन देवी सार्... नवरात्रि के अंतिम दिन सप्तश्रृंगी गढ़... વિજ્યાદશમી પાવન અવસરે કપડવંજમાં ક્ષત્ર... ગણદેવી તાલુકાના ગડત ગામમાં નવરાત્રી અન... गुलशन देवैया: अभिनय में विविधता हासिल... केंटकी के छोटे शहर नई हॉलीवुड हॉटस्पॉट...
20 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

भोरमधील ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोडा; १२ तासांत ५ आरोपींना राजगड पोलिसांनी अटक

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 20 अक्टू. 2026, 02:50 PM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्याच्या भोर तालुक्यातील खेड शिवापुर येथील श्रीनाथ ज्वेलर्सवर बुरखा घालून दरोडा टाकणाऱ्या ५ आरोपींना राजगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील खेड शिवापुर येथील श्रीनाथ ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोडा प्रकरणाचा छडा राजगड पोलिसांनी केला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास बुरखा घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी हातात कोयते आणि बंदुका घेऊन दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बाजूच्या दुकानदाराला बुरख्यात आलेल्या या व्यक्तींच्या हालचाली संशयित वाटल्या. गडबड जाणून घेतल्यानंतर त्याने ज्वेलर्स दुकानात डोकावून पाहिले आणि सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून दरोडेखोरांनी तिथून धूम ठोकली, त्यामुळे हा दरोडा फसला.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हात घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १२ तासांत आरोपींना निष्पन्न केले आणि बेड्या ठोकल्या. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी आणलेली दुचाकी शोधून काढली असून, तांत्रिक पुरव्यांच्या आधारे त्यांनी आरोपींचा शोध घेतला आहे.

या प्रकरणात एकूण सहा आरोपी सहभागी होते, त्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ईश्वर गोपीनाथ वाघमारे (वय ३०, रा. वांगी बुद्रुक, ता. धाराशिव, जि. धाराशिव), शैलेश हरीश साबळे (वय २१), करण गोपाळ हजारे (वय २१) आणि तानाजी नामदेव लोंढे (वय ३९, तिघे रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव, राजगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
📲Get App