🔥 TRENDING PM Modi Addresses Platinum Jubilee of... PVR INOX Reports Q2 Turnaround, Reveal... सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? शरद प... कलेक्टर ने मादक पदार्थों के अवैध व्याप... Bihar Board to Publish 2027 Class 10 &... Opposition Leader Slaps Municipal Work...
25 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर तालुक्यातील पिसावरे येथे कुत्र्यांच्या तावडीतून भेकराच्या पिल्लाची सुटका

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 25 Nov 2026, 12:18 PM 👁 26
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्याच्या भोर तालुक्यातील पिसावरे येथे कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करत भेकर पिल्लाला वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले.

भोर तालुक्यातील पिसावरे येथे भेकर जातीच्या पिल्लाला कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आणि त्याचे प्राण वाचविले गेले.

ओंकार चौधरी आणि त्यांचे कुटुंब रानात काम करत असताना, कुत्रे भेकर पिल्लाचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यावर ओंकार, दिलीप चौधरी आणि संचित चौधरी यांनी पिल्लाला कुत्र्यांच्या तावडीतून बाहेर काढले. पिल्लाला घरी नेऊन पाणी पाजले आणि देखभाल केली.

त्यानंतर वनविभागाला कळवून वनरक्षक शकुंतला गोरे यांनी पिसावरे येथे जाऊन पिल्लाची पाहणी केली. कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री करून पिल्लाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

तरुणांच्या तत्परतेमुळे भेकर पिल्लाला वेळेवर मदत मिळाली आणि त्याचे प्राण वाचले.
📲Get App