🔥 TRENDING Tripura CM says INDIA bloc lacks commo... देवास में भीषण सड़क हादसा, फॉर्च्यूनर... Himachal Pradesh to Invest ₹15,000 Cro... बासवकल्याण में 25वें कल्याण पर्व के रज... Honey and Milk for Relief from Chapped... Successive Weather Disturbances Set to...
25 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर तालुक्यातील अंगसुळे ग्रामस्थांनी भेकराचे प्राण वाचवले, वनविभागाने तातडीने उपचार

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 25 Oct 2026, 05:30 PM 👁 20
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोर तालुक्यातील अंगसुळे गावात भेकर गंभीर जखमी अवस्थेत सापडले; ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे भेकराला वेळेवर उपचार मिळाले आणि प्राण वाचला.

भोर तालुक्यातील अंगसुळे गावात रात्री कुत्र्यांच्या पाठलागामुळे भेकर गंभीर जखमी अवस्थेत सापडले. ग्रामस्थ आयुष किसन राऊत व अक्षय शंकर राऊत यांनी भेकराला कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून गावचे पोलीस पाटील भानुदास तावरे यांना माहिती दिली.

पाटील तावरे यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक नरेश भाई, के. एम. हिमोने, शुभम बाबर व अविनाश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

वनकर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केल्यावर भेकराच्या मागील डाव्या पायात पूर्णपणे तुटल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे तातडीने उपचाराची गरज होती. त्यानंतर भेकराला बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये हलवून पुढील उपचारासाठी दाखल केले.

वनविभागाच्या तत्परतेमुळे जखमी भेकराला वेळेवर मदत मिळाली आणि त्याचे प्राण वाचले.
📲Get App