🔥 ट्रेंडिंग गीता बेसरा ने याद की बचपन की अभिनेत्री... रामायण फिल्म को मिली पहली समीक्षा: समी... त्रिपुरा के गोमती जिले में केंद्र मंत्... त्रिपुरा के कल्याणपुर में महिलाओं ने फ... त्रिपुरा नई एफ़टीए से निर्यात‑उन्मुख व... हिमाचल पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत 4...
05 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

भोर तालुक्यात हिवाळ्यामध्येच कडाक्याच्या उन्हाने जोर धरल्याने रसवंती गुऱ्हाळांचा खुळ-खुळ आवाज वाजू लागला भोर बाजारपेठेत रसवंती दुकानावर नागरिकांची गर्दी

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 30 अक्टू. 2026, 11:10 AM 👁 72
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काहीशा प्रमाणात उकाडा जानू लागत असल्याने नागरिक रसवंती ग्रहांवर थंडपेयांसाठी गर्दी करत असतात.मात्र यंदा मागील दोन महिन्यांपासून भोर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने हिवाळ्यातच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रसवंती गृहांवर थंड पेयांसाठी गर्दी वाढू लागली आहे.
भोर तालुक्यात दुष्काळामुळे खरिपातील पिके पूर्णतः वाया गेली असून पुढील काही दिवसातच नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ येणार आहे. यंदा मान्सूनने सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना उत्कृष्ट साथ दिली असली तरी शेवटच्या टप्प्यात खरिपातील पिके जोमात आली असतानाच पावसाने दडी मारल्याने पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून बदलत्या हवामानामुळे तसेच उष्णतेने आबाल वृद्ध हैराण झाले आहेत.नागरिकांना उष्णता सहन होत नसल्याने तालुक्यातील तसेच शहरातील ठिक ठिकाणच्या रसवंती ग्रहांवर नागरिक गर्दी करू लागले असल्याने यंदा रसवंती ग्रहांचे खुळखुळे हिवाळ्यातच वाजू लागल्याचे चित्र आहे.वारंवार हवामानात होणारा बदल यामुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.दरम्यान दूषित हवामानामुळे बऱ्याचदा अनेकांना अशक्तपणा येत असतो.यावर एक उपाय म्हणून अनेक जण उसाच्या गुऱ्हाळांवर उसाचा रस पिण्यासाठी येत असतात. उसाचा रस अनेक आजारांवर लाभदायक असल्याने रसवंती ग्रहावरील रसाला नागरिक पसंती देत असतात.भोर तालुक्यात सद्यस्थितीला हिवाळा सुरू झाला असला तरी जवळजवळ ६० ते ७० रसवंती गृह सुरू करण्यात आले आहेत. इतरही रसवंती गृह लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे असे उसाच्या गुऱ्हाळांवर रस पिणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात आले.
📲Get App