🔥 TRENDING Lalu Prasad Yadav Appears in Siwan Cou... निमोद ग्राम पंचायत में जतमन बाबरिया ने... Three Suspects Killed in Patna Police... CM Mohan Yadav and BJP State President... ISRO ಹೊಸ ಭೂ-ವೀಕ್ಷಣಾ ಉಪಗ್ರಹವನ್ನು ಯಶಸ್ವಿ... Stone-pelting and arson disrupt Pancha...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर तालुक्यात 'भुत्या' परंपरेने जपतोय लोककला आणि समाजप्रबोधन

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 06 Nov 2026, 01:45 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात आजही 'भुत्या' ही लोककला परंपरा जिवंत आहे. संबळ आणि तुणतुण्याच्या तालावर देवीची गाणी, आरत्या आणि भारुडे गाऊन हे लोककलावंत समाजप्रबोधनासोबतच भक्तीचा प्रसार करत आहेत.

पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही एका अनोख्या परंपरेचे जतन केले जात आहे. 'भुत्या' म्हणून ओळखले जाणारे लोककलावंत संबळ आणि तुणतुण्याच्या तालावर देवीची गाणी, आरत्या आणि भारुडे गातात. या माध्यमातून ते समाजप्रबोधन करण्यासोबतच भक्तीचा प्रसारही करत आहेत.

विशेषतः दसरा आणि दिवाळीच्या काळात हे भुत्या घरोघरी फिरतात. देवीच्या आरत्या आणि गाणी गाऊन ते ग्रामीण भागातील लोकांच्या आशा-निराशा, सुख-दुःख समजून घेतात. त्यांना परमार्थाचा उपदेश देऊन समाजात आशेचा किरण जागृत करण्याचे आणि आत्मविश्वास निर्माण करून जनजागृती करण्याचे काम ते करतात.

बदललेली जीवनशैली, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता यामुळे पारंपरिक कलांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला असला तरी, भोरमधील दुर्गम भागात फिरून भुत्या आजही आपली लोकसेवा अविरतपणे देत आहेत. घरोघरी जाऊन देवीची गाणी आणि आरत्या गाल्ल्यानंतर शेतकरी आणि महिला आनंदाने त्यांना तेल, धान्य किंवा पैसे दान करतात आणि आशीर्वाद घेतात.

आधुनिक युगात अनेक लोककला लोप पावत असताना, भोरमधील दुर्गम भागात ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. गळ्यात कवड्यांची माळ, कपाळावर भंडारा आणि हातात संबळ-तुणतुणे घेऊन गावागावांत फिरणाऱ्या या 'भुत्यां'च्या माध्यमातून आजही भक्तीरसासोबतच समाजप्रबोधनाचा अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे.
📲Get App