🔥 ट्रेंडिंग રાજકોટમાં આંબેડકર ચોક નજીક પરેશ ચૌહાણન... LCB ઝોન-8એ 4 વર્ષથી ફરતા વાહનચોરી આરોપ... Mathura मिशन शक्ति से मिला बेटियों को... उत्तर प्रदेश एड्स नियंत्रण सोसाइटी कर्... અમદાવાદમાં 'મિશન સાયબર રક્ષિકા' હેઠળ 8... કોયારી ગામે મહાકાળી માતાના સાતમા પ્રાણ...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

भोर तालुका ओल्या, कोरडा दुष्काळाचा साक्षीदार भोर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 13 अक्टू. 2026, 04:00 PM 👁 27
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सध्या कोरड्या दुष्काळाने खरीप वाया-शेतकरी चिंतेत
भोर तालुका दुर्गम डोंगरी असल्याने दरवर्षी मान्सून सुरू होताच अतिवृष्टी होत असते.अतिवृष्टीत खरिपातील पेरणी केलेली पिके उत्कृष्ट उगवण होऊन जोमात येऊ लागतात.मात्र अनेकदा शेतकऱ्यांना सतत चार महिने पाऊस सुरू असल्याने ओला दुष्काळाला सामोरे जावे लागते. तर बहुतांश वेळा सुरुवातीच्या काळात दोन महिने पाऊस सुरू राहून पुढे पावसाने दडी मारल्याने पिके पाण्याअभावी सुकून गेल्याने भोर तालुक्यात सद्यस्थितीला कोरडा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून भोर तालुक्यात खरिपातील पिके कधी अतिवृष्टीने तर कधी कोरड्या दुष्काळाने वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक चक्र मंदावले गेले आहे. दरम्यान यंदा अतिवृष्टी न होता पावसाने खरिपातील पिकांना साथ दिल्याने पिके जोमात आली असतानाच सद्यस्थितीला दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने भोर तालुका ओल्या,कोरडा दुष्काळाचा साक्षीदार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हवामानाचा लहरीपणानसार पावसाळ्यात कधी जोरदार पाऊस तर कधी पूर्णता पाऊस दडी मारतो. भोर तालुका भाताचे आगार असून पावसाळ्यात भात पिकाबरोबरच महत्त्वाचे सोयाबीन, नाचणी तसेच भुईमूग, घेवडा, तूर, मूग, उडीद पिके घेतली जातात. यातील घेवडा तूर मूग उडीद या पिकांना पाऊस प्रमाणात लागतो तर भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर पडणे आवश्यक असते. यंदा मात्र सुरुवातीच्या काळात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी वेळेत पूर्ण केली. पिके उगवण होऊन जोमात येऊ लागली असताना दोन ते अडीच महिने सलग पाऊस सुरू होता. दरम्यान शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा खरिपातील पिकांचे उत्पादन उच्चांकी मिळेल अशी आशा लागून राहिली होती. मात्र शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले असून मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पूर्णता वाया गेला आहे. शासनाने भोर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. शासनाने नुकसानग्रस्तांना भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भोर तालुक्यातील शेतकरी संघटनांकडून होत आहे.
📲Get App