🔥 TRENDING नवादा में 77,099 ऑनलाइन आवेदन के साथ न... ममता (जितू की पत्नी), ग्राम लवाणी एमपी... वाराणसी में सनबीम सनसिटी ने आयोजित किय... अरवल पुलिस की बड़ी कार्रवाई: स्मैक तस्... ભારત પર્વ: ભારતના રંગો, સંસ્કૃતિ અને પ... हजारीबाग में अपहृत युवक का बचाव, काले...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर मध्ये नमो उद्यान साठी 75 लाखांचा निधी... काम सुरू

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 02 Nov 2026, 06:02 PM 👁 53
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पु णे जिल्ह्याच्या भोर शहरात नमो उद्यानाच्या निर्मितीसाठी काम काही दिवसापासून औपचारिकरित्या सुरू झाले. राज्य शासनाच्या विशेष योजनेतून भोर नगरपालिकेला उद्यानासाठी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा वापर भोर शहरातील नवी आळीतील बालोद्यानाच्या जागेवर नवीन उद्यान विकसित करण्यासाठी केला जात आहे.

उद्यानाची रचना शंकराच्या पिंडीच्या आकारात केली जाणार असून, त्यात अत्याधुनिक सुविधा समाविष्ट असतील.

उद्यानात बालोद्यान, रस्ते, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, औषधी वनस्पतींची लागवड, फुलबाग, पदपथ, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पाण्याचा पुनर्वापर करून चालणारे कारंजे यांचा समावेश असेल.

होती आणि ते बंद झाले होते. नमो उद्यानाच्या निर्मितीने ही जागा पुन्हा सुसज्ज होऊन भोरच्या नागरिकांसाठी खुली केली जाईल. पूर्वी कोट्यावधी रुपये खर्चुनही या बालोद्यानाची दुरावस्था झाली

नवीन उद्यानामुळे भोरच्या रहिवाशांना मनोरंजन, आरोग्य आणि सामाजिक संवादासाठी आधुनिक आणि सुरक्षित जागा मिळेल, ज्यामुळे शहराच्या शहरी विकासात महत्त्वपूर्ण भर घालेल.
📲Get App