🔥 ट्रेंडिंग Ravindra Jadeja and KL Rahul Lead Scor... मेहंदवास ग्राम पंचायत चुनाव: प्रत्याशि... Investigation ordered into alleged ₹16... Supreme Court Expresses Displeasure Ov... 'ਦੁਕਾਨ ਵਾਲੀ ਥਾਂ 'ਤੇ ਲੱਗੇ ਝੋਟੇ ਦਾ ਬੁੱਤ,... આદિજાતિ વિકાસ વિભાગ દ્વારા સંચાલિત EMR...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भोर - अजंदा मार्गावरील ५० हजारांच्या वीजतार चोरीचा उलगडा; रावेर पोलिसांकडून दोन सराईतांना अटक, २६ किलो मुद्देमाल जप्त....!!

भोर - अजंदा मार्गावरील ५० हजारांच्या वीजतार चोरीचा उलगडा; रावेर पोलिसांकडून दोन सराईतांना अटक, २६ किलो मुद्देमाल जप्त....!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 15 अक्टू. 2026, 08:34 PM 👁 11
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

१४ ऑक्टोबर रोजी रात्री गस्तीवर असताना गुन्हे शोध पथकाची कारवाई


रावेर तालुक्यातील भोर ते अजंदा रस्त्यालगत शेतशिवारातील विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियमच्या वीजतारा चोरणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला २६ किलो वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे, ता. रावेर) अशी आहेत. न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत रावेर पोलीस ठाण्यात दि. ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अग्रवाल पॉवर प्रा. लि. कंपनीत साइट सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले फिर्यादी राजेंद्र रामदास ठाकूर (रा. भादली, ता. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ मधील भोर ते अजंदा रस्त्यालगतच्या विद्युत खांबांवरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या वीजतारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळ शेतशिवारात असल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून कोणतीही माहिती मिळाली नव्हती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवारातील मोटारपंप व वीजतार चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेंतर्गत भंगार दुकाने, सराईत गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर यांची तपासणी सुरू होती.

दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना रावेर-अजंदा रस्त्यावर काही संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी पाठविले. पथकाला जुबेर तडवी व शरीफ तडवी हे दोघे संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वीजतारा कापण्यासाठी वापरले जाणारे कटर व पक्कड मिळून आले.

त्यांना पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केली असता, वीजतार चोरीच्या उद्देशाने ते परिसरात आल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच दोन ते तीन महिन्यांपूर्वी भोर ते अजंदा रस्त्यावरील वीजतार चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासात विवरे गावातील एका भंगार व्यावसायिकाकडून चोरीतील २६ किलो वीजतारांचे तुकडे जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यावसायिकाने स्वतःहून ते पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.

या दोघांनी यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का? तसेच शेतशिवारातील इतर वीजतार व मोटारपंप चोरीशी त्यांचा संबंध आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन आमोदकर, विजय चौधरी, समाधान ठाकूर आणि पोलीस कर्मचारी विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील व रुबाब तडवी यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहेत.
📲Get App