🔥 TRENDING Prem Sagar Rao Announces Upcoming Meet... 5‑day‑old infant dies after AC blast s... AI Trustworthiness Tied to Internet Qu... OrissaDiary.com Publishes Feature “Fro... Visakhapatnam Leads YouthPOWER Ranking... AP CM Chandrababu Naidu hands over hou...
22 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भालोद हादरले! दारूच्या नशेत किरकोळ वादातून दोन मित्रांनी केली तिसऱ्या मित्राची हत्या, मृतदेह खड्ड्यात फेकून पलायन....!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 22 Sep 2026, 11:08 AM 👁 8
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा थरार - माशांच्या जेवणावरून वाद, डोक्यात दगड घालून मजुराचा जागीच अंत

फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे क्षुल्लक कारणातून मित्राचीच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही निर्घृण हत्या घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करून हत्येचा छडा लावला आहे.

मयताचे नाव रमेश ईश्वरसिंग भावर (वय ३५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) असे असून तो मजुरीचे काम करत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मयत रमेश भावर आणि आरोपी सूरज कोळी व सूरज उर्फ गोलू नेमाडे हे दोघेही मजुरीचे काम करतात. तिघांमध्ये चांगली मैत्री असून तिघांनाही एकत्र दारू पिण्याची सवय होती. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास तिघेही भालोद येथे एकत्र बसून दारू पीत होते.

यावेळी मयत रमेश याने स्वतःच्या पैशाने मासे विकत आणले होते व ते जेवण तयार करण्यासाठी मुकेश नावाच्या मित्राकडे दिले होते. त्यावेळी आरोपी सूरज कोळी याने रमेशकडे त्याच्या वडिलांनाही माशांचे जेवण देण्याचा हट्ट धरला. याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

दारूच्या नशेत या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपी सूरज कोळी आणि सूरज उर्फ गोलू नेमाडे यांनी संगनमत करून रमेश भावर याच्या डोक्यात भक्कम दगडाने जोरदार प्रहार केले. या गंभीर मारहाणीत रमेशचा जागीच मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

हत्येनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मयताचा मृतदेह नजीकच्या एमएसईबी (MSEB) कार्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात फेकून दिला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत.
📲Get App