🔥 TRENDING Gujarat chief minister tours US and Ca... SIR Notices Trigger Anxiety Among 9.28... Telangana autorickshaw unions call off... India Open 2028 Relocated to Guwahati... Fisherman Dies in Accident While Fishi... Bathinda road dispute escalates as ETO...
24 Aug 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sarkari Yojana

भोकरदन: फत्तेपूर गावातील २७५ गरजू कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काची घरकुले मंजूर

✍️ Reporter: Vishnu Pawar 🗓 23 Aug 2026, 11:17 PM 👁 15
Watch on: 📷 Instagram
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांतून फत्तेपूर गावातील गरीब कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे.

भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर गावातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गावातील २७५ गरजू कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काची घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.

या घरकुलांच्या मंजुरीसाठी भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.

घरकुल मंजुरीच्या या निर्णयामुळे फत्तेपूर गावातील लाभार्थी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेमुळे आता गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा होणार आहे.
📲Get App