🔥 TRENDING एंबुलेंस न मिलने पर किसान को बाइक पर ब... Daughter-in-law accused of hiring cont... India, spearheaded by Bumrah, restrict... Allu Arjun’s Pushpa 2 Turns Two Years... Avengers: Doomsday Nets Rs 15 Cr in Ad... Delhi HC Dismisses Doctors' Plea on ‘S...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भोईर कुटुंबाचे आमरण उपोषण अखेर तात्पुरते स्थगित; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर १३ व्या दिवशी निर्णय.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 19 Nov 2026, 10:28 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड

ठाणे मुरबाड (प्रतिनिधी): विशेष वृत्त
शहापूर-मुरबाड तालुक्यातील शाई येथील अनंता दत्तू भोईर यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुरबाड तहसील कार्यालयाबाहेर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर १३ व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उपोषणादरम्यान अनंता भोईर यांची प्रकृती खालावल्याने आणि प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
नेमके प्रकरण काय?
अनंता दत्तू भोईर यांनी ५ नोव्हेंबरपासून मुरबाड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. गेल्या १३ दिवसांत वनविभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्यात अनेकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या; मात्र त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे १७ नोव्हेंबर रोजी समाजबांधवांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्रिसदस्यीय समितीची स्थापना
आंदोलनाचा वाढता दबाव आणि अनंता भोईर यांची बिघडलेली प्रकृती लक्षात घेता, तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या दालनात तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला वनविभाग, महसूल विभागाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सखोल चर्चेअंती या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही समिती आगामी १५ दिवसांत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे. प्रशासनाने दिलेल्या या ठोस आश्वासनानंतर भोईर कुटुंबाने आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले असून, आता या समितीच्या अहवालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
📲Get App