🔥 TRENDING 📢 ग्राम पंचायत तूरा के विकास का संकल्... મલેકપુર પાદેડી હાઇવે પર ગાડી પલ્ટી Ajith Kumar’s ‘Dare Devil’ Prepares fo... Fujifilm Unveils New Hybrid Instant Ca... Madras High Court Dismisses KN Nehru’s... Tamil Nadu's Aavin Raises Dairy Prices...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अवसरी खुर्दमध्ये वैरणीच्या वळईला आग; शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान...!! दुग्धव्यवसायासाठी साठवलेला चारा जळून खाक; आगीच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी..!

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 26 Oct 2026, 09:41 AM 👁 51
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
अवसरी खुर्दमध्ये वैरणीच्या वळईला आग; शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान...!!

दुग्धव्यवसायासाठी साठवलेला चारा जळून खाक; आगीच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी..!

सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

(अवसरी खुर्द, ता. आंबेगाव ) : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील कौली मळा परिसरात वैरण आणि कडब्याच्या वळईला आग लागून शेतकरी मंगेश मिनानाथ भोर यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी (दि. २४) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जनावरांसाठी साठवून ठेवलेला संपूर्ण चारा आगीत जळून खाक झाल्याने भोर कुटुंबीयांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.8

मंगेश भोर यांचा दुग्धव्यवसाय असून त्यांच्याकडे चार गायी आहेत. जनावरांच्या चाऱ्याची वर्षभराची सोय व्हावी, यासाठी त्यांनी एक हजार पेंढ्या वैरण आणि एक हजार कडबा खरेदी करून गोठ्याजवळ साठवून ठेवला होता. मात्र, पहाटे अचानक लागलेल्या आगीत हा संपूर्ण चारा भस्मसात झाला.

निखिल भोर यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तातडीने मंगेश भोर यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर भोर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता लक्षात घेता साठवलेला चारा वाचविण्यात त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत स्पष्टता नसून या घटनेमागील कारणांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

ऐन चाऱ्याच्या गरजेच्या काळात जनावरांसाठी साठवलेला चारा जळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
📲Get App