🔥 ट्रेंडिंग विश्लेषक विनय राजानी ने निफ्टी में डिप... कर्नाटक सरकार के एम्बुलेंस ड्राइवरों न... Bhedar Police Use CEIR Portal to Recov... પોરબંદરમાં ફૂડ સેફ્ટી વિભાગની કાર્યવાહ... बिदर में धन्नूर पुलिस ने हुप्लाला गांव... बिदर में धन्नूर पुलिस ने हुप्लाला गांव...
14 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अमळनेरात प्लास्टिक विरोधी कारवाईचा बडगा; १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, दोन व्यावसायिकांना दंड...!!

अमळनेरात प्लास्टिक विरोधी कारवाईचा बडगा; १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, दोन व्यावसायिकांना दंड...!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 14 अक्टू. 2026, 10:35 AM 👁 10
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेरात स्वच्छतेसाठी नगरपरिषद ॲक्शन मोडवर

अमळनेर - शहरात वाढत्या प्रतिबंधित प्लास्टिक वापराला आळा घालण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने कठोर पावले उचलली आहेत. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दि. १३ ऑक्टोबर रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी गणेश कारखानीस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. पथकाने शहरातील गुरुकृपा प्लास्टिक, कोमल हॉटेल, संजय प्लास्टिक, बाबा प्लास्टिक आणि अनिल एजन्सी अशा पाच आस्थापनांची कसून तपासणी केली. यावेळी प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आणि वापर आढळून आलेल्या दोन ठिकाणी कारवाई करत दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे शहरातील नाले तुंबणे, कचऱ्याची समस्या आणि पर्यावरणाची हानी होत असल्याने नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री, साठवणूक आणि वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
📲Get App