🔥 TRENDING पानी की टंकी के नीचे जलभराव और गंदगी क... Majauliya ward number 3 nale ka Vikas... Sikkim TET 2026 Admit Cards Out Today;... TRIHMS Commences 2026-27 MBBS Batch In... Arunachal Author Wanggo’s Novel Joins... Arunachal Villagers Clash with Police...
01 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अमळनेरात खळबळ : दोन तरुणी आणि एका तरुणाचे अपहरण, तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल.....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 01 Oct 2026, 12:30 PM 👁 9
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर : शहरातील तीन वेगवेगळ्या भागात दोन तरुणी आणि एका तरुणाच्या अपहरणाच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४० (३) अन्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना शिरूड नाका परिसरात घडली. येथील १८ वर्षीय तरुणी २८ तारखेला दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान प्रताप महाविद्यालयात गेली होती. दरम्यान, ओंकार नगर येथील रोहित क्रितेश सोनवणे याने तिला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तरुणीच्या आईने दिली आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

दुसरी घटना कचेरीमागील परिसरातील आहे. २१ वर्षीय तरुणीला २८ तारखेला सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

तिसरी घटना पैलाड भागातील साई गजानन नगर येथे घडली. २३ तारखेला सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कनराज रमेश पारधी (वय ३५) याचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. त्याला गुपचूपपणे व बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याची फिर्याद त्याचे भाऊ योगीराज पारधी यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास उदय बोरे करीत आहेत.

शिरूड नाका, कचेरीमागील परिसर आणि पैलाड अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांकडून तिन्ही प्रकरणांचा समांतर तपास सुरू आहे.
📲Get App