🔥 TRENDING एक रसगुल्ले के लिए इतनी बड़ी गुंडागर्द... SC: Govt employees auto-suspended afte... Kochi Corporation launches six-month w... AAP Blasts BJP Over Haryana-Punjab Smo... Nvidia, CEO Huang Face Class-Action La... Trinamool MLA Paresh Ram Das Arrested...
10 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

ऐन सणा सुदीला मुंबई सह ठाण्यात आगीचे तांडव.उप नगरात आग

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 10 Nov 2026, 06:25 AM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक १०/११/२०२६ विशेष वृत्त
मुंबई : दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या रात्री राज्यभरात मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र, या आतषबाजीमुळे मुंबई आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी भीषण आगीच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील डोंगरी परिसरात गॅरेज आणि गोदामांना लेव्हल-2 ची भीषण आग लागली, तर चेंबूर आणि ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातही इमारती आणि झाडांनी पेट घेतला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली असून अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.
: डोंगरी पोलीस ठाण्यासमोर गॅरेजला भीषण आग
आगीची भीषणता पाहून अग्निशमन दलाने रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी ही लेव्हल-2 (Level-2) ची आग असल्याचे घोषित केले. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, बेस्ट प्रशासन, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चेंबूरच्या मैत्री पार्कमध्ये आतषबाजीमुळे झाडाने घेतला पेट
मुंबईतील चेंबूर भागातही आतषबाजीमुळे आगीची घटना घडली आहे. चेंबूर येथील मैत्री पार्क परिसरातील 'क्रीतिका ॲनेक्स' नावाच्या इमारतीच्या आवारात फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे थेट झाडाने पेट घेतला. झाडाला लागलेली आग पाहता पाहता भडकल्याने इमारतीमधील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
ठाण्यात 17 मजली इमारतीला आग
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही आगीची मोठी घटना घडली. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन मधील 'कार्लाइल' या 17 मजली इमारतीला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या वाहनांनी आणि जम्बो वॉटर टँकरच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. या इमारतीत अडकलेल्या नागरिकांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
अंधेरीत इमारतीला आग
दिवाळी सणासोबतच मुंबईत आगीचे सत्र सुरूच असून अंधेरी लोखंडवाला परिसरात निर्माणाधीन इमारतीला भीषण आग लागली आहे. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील ओबेरॉय स्काय हाईट या निर्माणाधीन इमारतीला मोठी आग लागली आहे. इमारतीत सध्या कामगारांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.
आगीमुळे जीव वाचवण्यासाठी कामगारांची एकच धावपळ झाल्याचं दिसून आलं. आग लागल्याची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कामगार आणि पोलिसांकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू
दिवाळीसाठी दोन्ही मुली गावी आल्या; संपूर्ण कुटुंबीयांसह आगीत होरपळल्या; धाराशिवमध्ये एकाच कुटूम्बातील ४माणसे होरपळून ठार झाली.
📲Get App