🔥 TRENDING Swadesh Fest: Six Bollywood Stars Shin... Koffee With Karan to End: Fans Recall... IMDb Lists 7 Bollywood Actors Who Are... Khosla Ka Ghosla 2 Set for March 2027... Squid Game star Jung Hoyeon eyes Bolly... Saiyami Kher Expresses Desire to Share...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

अँड . हरिश पाटील निवडले मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 14 Oct 2026, 02:52 AM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सामाजिक कार्य आणि राजकीय वारसा लक्षात घेऊन ॲड. हरीश पाटील यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या नवी मुंबई अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

ॲड. हरीश पाटील यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या नवी मुंबई अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सचिव आणि निवृत्त पोलीस अधिकारी आनंद जाधव यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर केली.

पाटील हे कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे रहिवासी असून, ग्रीनस्केप रॉयल को‑ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये सुमारे दीड वर्ष उपाध्यक्षपद आणि २०२५ ते २०२६ या कालावधीत अध्यक्षपद भूषविले आहे. या काळात त्यांनी सामाजिक उपक्रम आणि सोसायटीशी संबंधित विविध कामांमध्ये सहभाग घेतला.

त्यांच्या कुटुंबाला राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. आजोबा जापोरे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील पहिले सरपंच होते; काका सुमारे १५ वर्षे सरपंच आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषविले. पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाचे माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल यांच्याशीही संबंध आहेत.

पाटील यांनी समाजातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठविणे, अडचणीत असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करणे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत तोंडी किंवा लेखी सल्ला देऊन मदत करणे या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू असल्याचे सांगितले.

नवी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, सामाजिक प्रश्नांवर काम करणे आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
📲Get App