🔥 TRENDING Rahul Gandhi Accuses Centre of Regime‑... લાઠીમાં યુવકને કપાસની દવાનું ઢાંકણું મ... British envoy urges Indians to explore... NatWest Series Cricket Grounds: Venues... India’s Scheduling Chaos: How Much is... Ex-India Cricketer Questions Accountab...
19 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका शालिनी गावित यांना 'बेस्ट ट्रस्टी इन कॉलेज' पुरस्कार

✍️ Reporter: Suman Gavit 🗓 19 Oct 2026, 08:46 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुंबईत आयोजित 'स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६' सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सौ. शालिनी गावित यांचा गौरव करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आदर्श फाउंडेशन संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवापूरच्या संचालिका व आदर्श फाउंडेशन संस्थेच्या सचिव सौ. शालिनी गावित यांना 'बेस्ट ट्रस्टी इन कॉलेज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या मीडिया पार्टनरशिपमध्ये ईएसएफई यांच्या वतीने आयोजित 'स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६' या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सोहळा गुरुवारी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडला.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या नियोजन, व्यवस्थापन आणि संस्थात्मक विकासामध्ये सौ. शालिनी गावित यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनातील त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका म्हणून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीहित आणि प्रशासकीय व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे. तसेच आदर्श फाउंडेशनच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळताना त्या ग्रामीण व आदिवासी परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविण्यासाठी सतत कार्यरत आहेत.

या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे आदर्श फाउंडेशन व आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सौ. शालिनी गावित यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे नवापूरसह नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या नावलौकिकात भर पडली आहे.
📲Get App