आमोदा येथील तलाठी एक हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात.....!
यहाँ देखें:
▶️ YouTube
विभागीय प्रतिनिधी
यावल : शेताच्या सातबारा उताऱ्यावर बोरवेलची नोंद करून ऑनलाईन उतारा देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शैलेश अंकुश झोटे (वय ३८, सध्या रा. रावेर, मूळ रा. मेहकर, जि. बुलढाणा) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार शेतकऱ्याने शेतात सिंचनासाठी बोरवेल खोदले आहे. शासकीय योजनेतून सोलर सिस्टीमचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर बोरवेलची नोंद असणे बंधनकारक होते. त्यासाठी त्यांनी आमोदा सजाचे तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे संपर्क साधला होता. या कामासाठी तलाठ्याने सुरुवातीला ४ हजार रुपयांची लाच मागितली. नाईलाजाने तक्रारदाराने त्यापैकी ३ हजार ५०० रुपये रोख दिले होते.
त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी तक्रारदार पुन्हा तलाठ्याकडे गेले असता, झोटे याने उर्वरित ५०० रुपये आणि नोंद केल्याबद्दल आणखी ५०० रुपये, असे एकूण एक हजार रुपये देण्याची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आज, दि. ६ ऑक्टोबर रोजी आमोदा ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष पडताळणी केली असता तलाठी झोटे याने यापूर्वी ३,५०० रुपये घेतल्याचे मान्य करून उर्वरित एक हजार रुपयांची लाच मागितली आणि ती पंचांसमक्ष स्वीकारली. यावेळी ACB च्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई जळगाव ACB च्या पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुनील वानखेडे, पोना प्रणेश ठाकूर आणि मनोज पाटील यांच्या पथकाने केली.
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 0257-2235477 आणि 7588661064 वर संपर्क साधावा, असे आवाहन ACB ने केले आहे.