🔥 TRENDING कैनाल सड़क निर्माण संघर्ष समिति का हुआ... अंबेडकर नगर में हवाई हमले की आपातकालीन... भितरवार से केरुआ की ओर धान लादे ट्रक क... বৈচীর ঐতিহ্যবাহী জগদ্ধাত্রী পুজোর বিসর... નવાં નીરની આવક દિવાળી અને નૂતન વર્ષ ૨૦૨૬: ૧૬૩ લિંબાયત...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

आईच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना सायकल वाटप; भारत वाघमारे यांचा अनोखा उपक्रम

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 22 Nov 2026, 08:02 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
*समाजातील पुढारलेल्या व्यक्तींनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा*
- हरिदास टोणपे

सोलापूर दिनांक 21 नोव्हेंबर:
चर्मकार समाजातील शैक्षणिक व आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती केलेल्या समाजातील पुढारलेल्या व्यक्तींनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मत पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी आपल्या आईच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चर्मकार समाजातील गरजू 40 विद्यार्थ्यांनी व 35 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून अनोख्या पद्धतीने अमृत महोत्सवी कार्यक्रम साजरा केला. चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने श्रीमती कांताबाई अंगद वाघमारे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी सदर सायकलीचे वितरण निवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले, निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी गवळी, गजराबाई जेऊरकर, निवृत्त गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे, निवृत्त उपअधीक्षक भूमी अभिलेख यशवंत कांबळे, राजशेखर जेऊरकर या मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या.
प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्मकार समाज विकास मंडळाचे मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी श्रेया बगले, प्रतीक्षा चाबुकस्वार,भाग्यश्री काळे, समर्थ कांबळे यांनी आपल्या मनोगतातून संयोजकाचे आभार मानून सदर उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन धूळराव यांनी केले तर आभार सुजाता हरवाळकर यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम शिंदे, वामन धूळराव,सदाशिव कांबळे, सुचेंद्र बनसोडे ,अंबादास वाघमारे, संगीता शिंदे, सुनिता वनस्कर, अशोक धुळराव, ज्योती बनसोडे, कल्लप्पा व्हनहुवे, राजू व्हनकोरे इत्यादींनी परिश्रम घेतले.
📲Get App