🔥 TRENDING Sikkim CM urges cultural preservation... भारतीय जनता पार्टी कोयलीबेड़ा मंडल ने... Arunachal Pradesh CM greets Aka tribe... CM Mohan visits Alirajpur on Jayanti,... नाचना ग्राम पंचायत में सरपंच पद के लिए... Three Odia Shows – Mahakali, Chutki, a...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

आ. अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत १६ नोव्हेंबरला शिरपूर साखर कारखान्यात मोळी पूजन ऊसाला दर जाहीर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 15 Nov 2026, 11:13 AM 👁 41
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आ. अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत १६ नोव्हेंबरला शिरपूर साखर कारखान्यात मोळी पूजन ऊसाला दर जाहीर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

आ. अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत १६ नोव्हेंबरला शिरपूर साखर कारखान्यात मोळी पूजन
ऊसाला दर जाहीर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
शिरपूर, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आ. अमरीशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत माँ रेवा शुगर्स प्रा. लि. च्या माध्यमातून शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊसाला प्रतिमेट्रिक टन ३४११ रुपये दर जाहीर केला आहे. तसेच दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरपूर साखर कारखान्याचा मोळी पूजन कार्यक्रम करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार काशिराम पवार यांच्या शुभहस्ते आणि माँ रेवा शुगर्स प्रा. लि. चे संचालक अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर, दहिवद येथील कारखाना स्थळावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला होता.
या बैठकीत माँ रेवा शुगर्स प्रा. लि. संचलित शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माँ रेवा शुगर्स प्रा. लि. चे संचालक अंकित गोयल यांच्या वतीने आगामी गळीत हंगामासाठी ऊसाला प्रतिमेट्रिक टन ३४११ रुपये दर जाहीर करण्यात आला. यावेळी आमदार अमरीशभाई पटेल, माँ रेवा शुगर्स प्रा. लि. चे संचालक अंकित गोयल, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, जनरल मॅनेजर गणेश यादव, कारखाना संचालक के. डी. पाटील, वासुदेव देवरे, राहुल रंधे, डी. पी. माळी, धनंजय पाटील, नारायणसिंग चौधरी, संग्रामसिंग राजपूत, भरत पाटील, सौ. सुचिताताई पाटील, प्रकाश चौधरी, अँड,़ बाबा पाटील, कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी राजेंद्र पाटील, जगतसिंग राजपूत, अनिल पाटील, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, माँ रेवा कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना सुरळीतपणे सुरू राहावा, कारखान्याची भरभराट व्हावी आणि ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे हित जपले जावे, यासाठी आमचे पूर्ण समर्थन व पाठबळ राहील. कारखान्याने भविष्यातही यशस्वी वाटचाल करावी आणि शेतकरी बांधवांसह कारखान्याशी संबंधित सर्व घटकांची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या
शिरपूर साखर कारखान्याचा मोळी पूजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरपूर साखर कारखान्याचा मोळी पूजन कार्यक्रम होणार आहे. गळीत हंगामाच्या शुभारंभापूर्वी कारखाना परिसरात नवचंडी यज्ञ व विधिवत पूजा-अर्चा करण्यात येणार आहे. ऊसाला प्रतिमेट्रिक टन ३४११ रुपये दर जाहीर करून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
📲Get App