🔥 ट्रेंडिंग चूरू जिला परिषद चुनाव: पूर्व नेता प्रत... 'वृषकर्मा' की गाने 'चलो पढ़ावे' की प्र... अमेरिका के राष्ट्रीय साइबर निदेशक ने ब... मसूद मलिक भारत आए, तीन साल बाद पहला पा... गूगल और ब्लू ओरिजिन ने अंतरिक्ष में AI... અમરેલી-સાવરકુંડલા હાઈવે પર ગમખ્વાર અકસ...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

दक्षिण सोलापूरच्या गावांना भीमेचे पाणी मिळावे; आमदार देशमुख साहेब

✍️ रिपोर्टर: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 09 नव. 2026, 08:59 PM 👁 74
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी अद्याप दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज-चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि विजयपूर (विजयपुरा) जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयातून ठोस निर्णय घेऊन भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करावा आणि औज-चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असले, तरी वडापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचचल्यानंतर पुढील प्रवाह थांबला आहे. त्यामुळे कारकल, बाळगी, सादपूर, निवर्गी, औज, कुरघोट, माळकवठे, नांदणी, टाकळी आणि चिंचपूर यांसह परिसरातील अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टाकळी येथे शेतकरी आणि नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
📲Get App