🔥 TRENDING Karnataka Extends Deadline for NEET PG... Supreme Court Dismisses Tamil Nadu's R... MP Amritpal Singh released from Debrug... RJD’s ex‑candidate Lallu Mukhiya congr... PM Modi's November 21 rally to be held... 20-year-old ITI student found hanged i...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पांडुरंगाची नगरी स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचे दिवाळीनिमित्त फराळ व नवीन कपड्याचे वाटप

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 09 Nov 2026, 08:55 PM 👁 72
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पंढरपूर येथे देवळीनिमित्त पांडुरंगाची नगरी स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगार दिवाळीनिमित्त फराळ व नवीन कपड्याचे वाटप जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान आवताडे, उमेश परिचारक, मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना नेते अनिल सावंत, माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, प्रणव परिचारक आदी उपस्थित होते

दिवाळीच्या निमित्ताने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपूर येथे पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगार बांधवांसोबत जयकुमार गोरे व आदी मान्यवरांनी दिवाळी फराळाचा आनंद घेतला. महिला सफाई कामगारांना मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीने भाऊबीजेची भेट, तर पुरुष सफाई कामगारांना दिवाळी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

श्रीक्षेत्र पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सफाई कामगारांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या श्रमाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कुटुंबांना सन्मानाने जगण्यासाठी हक्काचे घर उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे हक्काचे घर देण्यासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त १५० सफाई कामगारांनाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. आषाढी वारीच्या काळात पंढरपूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात सफाई कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान मिळावा आणि त्यांच्या कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे.

यावेळी मा. जयकुमार गोरे पालकमंत्री सोलापूर जिल्हा, मा. आमदार प्रशांत मालक परिचारक, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, युवा नेते प्रणव परिचारक, दिग्विजय बागल, भाजप नेते माऊलीभाऊ हळणवर, दिलीप धोत्रे, सफाई कामगार नेते गुरु दोडीया, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, अनिल सावंत, नगरसेवक नागेश भोसले, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, नागरिक आणि मोठ्या संख्येने सफाई कामगार बांधव उपस्थित होते.
📍पंढरपूर | ९ नोव्हेंबर २०२६
📲Get App