🔥 ट्रेंडिंग Padru Pyau School में शिक्षक के आगमन स... सीधी जिले में रीवा लोकायुक्त टीम ने तह... ਖਾਟੂ ਸ਼ਿਆਮ ਜੀ ਮੰਦਰ ਨੇੜੇ ਰੈਸਟੋਰੈਂਟ ''ਚ ਲ... संत शिरोमणि नामदेव जी महाराज की 756वीं... खेमली में भगवान शालिग्राम की बारात: तु... त्रिपुरा उच्च न्यायालय ने NHIDCL से 24...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात एमडी ड्रग्ज विरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मुंबईतील तरुण ताब्यात!

✍️ रिपोर्टर: सतिश हजारे 🗓 25 अक्टू. 2026, 12:54 PM 👁 313
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळा परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत मुंबईतील एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एमडी पावडर, मोबाईल फोन एक दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण २ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहरुख आतिख शेख (रा. रॉयल हाउसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. गस्तीदरम्यान

लोणावळ्यात एमडी ड्रग्ज विरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मुंबईतील तरुण ताब्यात!

वलवण गावातील निता ईन हॉटेलजवळ कारवाई; एमडी पावडर, मोबाई व एक दुचाकी सह २ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा | प्रतिनिधी;

लोणावळा परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत मुंबईतील एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एमडी पावडर, मोबाईल फोन एक दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण २ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहरुख आतिख शेख (रा. रॉयल हाउसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

गस्तीदरम्यान संशयित आढळला

शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी वलवण गावातील नीता इन हॉटेलजवळ, मगनलाल चिक्कीच्या दुकानाशेजारी शाहरुख शेख हा बजाज सीटी 100 दुचाकीवर (क्रमांक MH 03 DY 7271) थांबलेला आढळला.

पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत एमडी पावडर आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त करत पुढील कायदेशीर कारवाई केली.

NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) मधील कलम ८(क) व २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ कोठून आणण्यात आला, तसेच त्याचा पुरवठा कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि मावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विध्वाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, पोलीस हवालदार संतोष शेठके, सागर नामदास, गणेश होककर, गणेश धनवे, सिद्धेश्वर पाटील, तुषार भोईटे, तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे, पोलीस हवालदार सतीश घोंगडे, संदीप मानकर आणि पोलीस शिपाई श्रीराम बोराडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोणावळा परिसरात अमली पदार्थांविरोधातील या कारवाईमुळे अशा पदार्थांच्या विक्री आणि पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाचा स्रोत आणि त्यामागील इतर व्यक्तींचा सहभाग तपासातून स्पष्ट होणार आहे.
📲Get App