🔥 TRENDING Karnataka Extends Deadline for NEET PG... Supreme Court Dismisses Tamil Nadu's R... MP Amritpal Singh released from Debrug... RJD’s ex‑candidate Lallu Mukhiya congr... PM Modi's November 21 rally to be held... 20-year-old ITI student found hanged i...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात चोरट्यांचा कहर लक्ष्मीपूजन साठी ठेवलेले दागिने व रोखड लंपास

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 09 Nov 2026, 06:32 PM 👁 78
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
लोणावळा शहरातील गवळीवाडा परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका सदनिकेला लक्ष्य करत तब्बल १४ लाख ५ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश केला आणि सोन्याचे मौल्यवान दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे गवळीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गवळीवाडा येथील देवकीनंदन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये राहणाऱ्या नीलम सूर्यकांत कदम (वय ३५) यांच्या घरी ही घरफोडी झाली. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ५:४५ ते ७:३० या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी उचकटून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला.

त्यानंतर घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सोन्याचे ८ तोळ्यांचे मंगळसूत्र!
४ तोळे ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार!
सोन्याचा चोकर!
कानातील विविध टॉप्स व झुमके!
सोन्याच्या दोन चेन!
एकूण २ तोळे वजनाच्या ३ अंगठ्या!
रोख रक्कम २५ हजार ५०० रुपये!

अशा प्रकारे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी नीलम कदम ! यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घरफोडीचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करीत आहेत.

शहरात घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाताना दरवाजे आणि खिडक्यांची योग्य सुरक्षा करावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षित कुलूप व्यवस्था करावी. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

लोणावळा पोलिसांसमोर आता या घरफोडीचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे.
📲Get App