🔥 TRENDING નર્મદામાં પલ્સ પોલિયો અભિયાનનો પ્રારંભ... Anandraj Ambedkar Issues Statement on... UP Deputy CMs Criticise SP Chief Akhil... ਡਿਬਰੂਗੜ੍ਹ ਜੇਲ੍ਹ ਪਹੁੰਚੇ MP ਅੰਮ੍ਰਿਤਪਾਲ ਸ... Delhi-NCR to Cut Air Pollution by 20%... BJP Faces Data Dilemma Ahead of 2024 G...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

छत्रपती संभाजीनगर: परदेशातून आरोपीला अटक, १४ युवतींचे लैंगिक शोषण व फसवणुकीचा आरोप

✍️ Reporter: Sayeed Shareq Sayeed Khaleq 🗓 22 Nov 2026, 01:35 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

प्रेमाचे नाटक करून छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि लाखो रुपये उकळले. एवढेच नाही तर दुबईला पळून गेलेल्या आरोपीला शहर पोलिसांनी परदेशातून अटक केली आहे. या प्रकरणात १४ युवतींना जाळ्यात ओढल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: एका २८ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले आणि लाखो रुपयांची फसवणूक केली. एवढेच नाही तर लग्नानंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आणखी पैसे उकळले आणि दुबईला पळून गेला. या प्रकरणी तरुणीने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून १ डिसेंबर २०२५ रोजी मोहम्मद माजीन अब्दुल राशीद शेख (वय ३२) याच्याविरुद्ध लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जून २०२० मध्ये लग्नाची मागणी घालून पीडितेसोबत विविध हॉटेलांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचदरम्यान त्याने तिच्याकडून लाखो रुपये उकळले. जेव्हा पीडितेला आरोपीचे पहिले लग्न झाले असल्याचे कळले, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. त्यानंतर आरोपीने तिला धमक्या देऊन आणखी पैसे उकळले.

विशेष म्हणजे, केवळ एकाच तरुणीचे नव्हे, तर अशाप्रकारे १४ युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पहिल्यांदाच एखाद्या संशयिताला थेट परदेशात जाऊन अटक करून आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा लव्ह जिहादच्या दृष्टिकोनातूनही तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश संघटन सचिव धनसिंह सूर्यवंशी यांनी या प्रकरणाचा त्या बाजूनेही तपास करण्याची मागणी केली आहे.
📲Get App