🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

युवा कार्यकर्ते प्रविण मारुती कोर यांची मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 13 Nov 2026, 04:47 PM 👁 101
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
मुरबाड विशेष वृत्त
दिनांक: १३/११/२०२६
प्रतिनिधी: जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले (ठाणे) सह तालुका प्रतिनिधी किशोर पवार (मुरबाड)

मुरबाड: मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्हाईस चेअरमनपदी युवा कार्यकर्ते श्री. प्रविण मारुती कोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुरबाड तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मुरबाडच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात एक तरुण, अभ्यासू आणि शेतकरी हितासाठी सदैव झटणारा चेहरा म्हणून प्रविण कोर यांची ओळख आहे. बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.
शेतकरी हितासाठी कटिबद्ध राहणार
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन प्रविण मारुती कोर यांनी आपल्या पुढील कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, बाजार समितीचा सर्वांगीण विकास करणे आणि शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन."
त्यांच्या या निवडीबद्दल मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे, बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातून ठिकठिकाणी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
📲Get App